१५ एप्रिलपासून वाळवा येथे पंचकल्याण महोत्सव कार्यक्रम

वाळवा येथील पंचकल्याण मांगलीक कार्यक्रमाचे १५ एप्रिलपासून आयोजन केले आहे. ३४ वर्षांनंतर पाच दिवस पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव होत आहे. मांगलीक कार्यक्रम पुढीलप्रमाणे १५ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता मंगलवाद्य घोषसह यजमानांचे आगमन, गुरूनियंत्रण, इंद्रप्रतिष्ठा, कंकणबंधन, मंगल कुंभानयन. सकाळी ९ वाजता ध्वजारोहण होईल.

मंडप उद्घाटन, मंडप वेदिप्रतिष्ठा, पंचामृत अभिषेक, पीठ यंत्राराधना, नवग्रह होम, शांती होम होईल. दुपारी तीन वाजता त्यागी गणांचे मंगल प्रवचन होणार आहे. तत्पूर्वी सवाल होतील. त्यानंतर यागमंडल विधान आहे. सायंकाळी पाच वाजता अंकुरारोपण, पंचकुंभविन्यास, भद्रकुंभानयन, संध्याकाळी सात वाजता जाप्य, सवाल, भेरीताडण, आरती, गर्भसंस्कार, गर्भकल्याणक, इंद्रसभा, षोडश स्वप्न दर्शन, अष्टकुमारीकेकडून मातेची सेवा केली जाईल.