सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी सोलापूर शहर महिला राष्ठ्रवादी काँग्रेसची यंत्रणा सज्ज झाली आहे.प्रचारासाठी मी व कार्याध्यक्ष चित्रा कदम यांनी मिळून महिला आघाडीची ४५ महिलांची शहर कार्यकारिणी जाहीर केली आहे. निवडणूक नियोजनाबाबत दोन बैठका घेतल्या असल्याची माहिती सोलापूर शहर महिला राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा संगीता जोगधनकर यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून महिलांसाठी उज्वला गॅस योजना, मातृत्व वंदना योजना, धनलक्ष्मी योजना, आयुष्यमान भारत, नारी सन्मान योजना या लोकप्रिय योजना राबविण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनेही महिलांसाठी अनेक लोकप्रिय योजना अस्तित्वात आणल्या आणि त्या यशस्वी राबवल्या आहेत.