आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाने तसेच नेत्यांनी मोठी तयारी केली आहे. राज्यातील स्टार आमदार अशी ओळख असणारे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील हेही सध्या विधानसभा तयारीला लागले असून मुंबई आणि परिसरात कामानिमित्त झालेल्या हजारो मतदारांना भेटण्यासाठी त्यांनी मुंबईत एका मेळाव्याचे आयोजन केले.गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या निसटत्या विजयाला हातभार लावणारे माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनीही या वेळेला निवडणूक रिंगणात उतरायची तयारी सुरू केल्याने शहाजी बापूंच्या अडचणी वाढल्याचे सद्या चित्र आहे.
यामुळेच शहाजी बापूंनी आता मतदारसंघातील जगण्यासाठी बाहेर गेलेल्या मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सांगोल्याचे फिक्स आमदार अशी जाहिरात बाजी दीपक साळुंखे यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यास सुरुवात झाली आहे.
यामुळे शहाजी बापूंच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. सांगोल्याचा गड राखण्यासाठी शहाजी बापू आता जोमाने तयारी लागली असून या दोघांच्या वादावर शेकाप लक्ष ठेवून आहे. मात्र शहाजी बापूंना गेल्या वेळी निवडून आणण्यात सिंहाचा वाटा असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपकआबा साळुंखे पाटील यांनीही आता विधानसभेची जोरदार तयारी सुरू केल्याने शहाजीबापू प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करताना दिसत आहेत.
दीपकआबा साळुंखे यांची मोठी ताकद असून सध्या त्यांच्याकडून ठाकरे गटाशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. सांगोल्यात महाविकास आघाडीचे तिकीट ठाकरे गटाला मिळाल्यास दीपक साळुंखे येथील उमेदवार असणार आहेत.