इचलकरंजी शहरांमध्ये नारळाची आवक ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सोमवारी अमावस्या, मंगळवारी गुढीपाडवा आणि त्यानंतर येणारा रमजान ईद यामुळे मुख्य बाजारपेठ तसेच रस्त्यावर नारळ विक्रीचे स्टॉल उभारले असून ग्राहकांची देखील नारळ खरेदीसाठी खूपच गर्दी होतानाचे चित्र दिसत आहे.
इचलकरंजी शहरांमध्ये तामिळनाडू राज्यातून मोठ्या प्रमाणात नारळ येतात आणि सुमारे पंधरा रुपयांपासून ते 25 रुपयांपर्यंत नारळ बाजारांमध्ये विक्री केला जात आहे. अमावस्या गुढीपाडवा आणि रमजान ईदच्या निमित्ताने नारळाची मोठ्या प्रमाणात उलाढाल होणार आहे असा अंदाज नारळ विक्रेत्यांनी केला आहे.