सोलापूर लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी आचारसंहिता भंग केल्याची तक्रार वैभव बिराजदार यांनी सोलापुरातील आचारसंहिता कक्षाकडे सोमवारी दिनांक ८ एप्रिल रोजी केली आहे.
आमदार शिंदे यांनी आचारसंहिता सुरू असताना वाहनांवर व सार्वजनिक ठिकाणी बॅनर लावून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षररीत्या प्रचार केल्याचा आरोप केला आहे.
सोलापूर शहरांमध्ये रिक्षांवर निवडणूक आयोगाची पूर्वपरवानगी न घेता प्रचाराचा बॅनर लावून त्यावर मोबाईल क्रमांक टाकला आहे. तो थेट आमदार शिंदे यांचा असल्याने शिंदे यांनी निवडणूक आयोगाच्या आदेशाचा भंग केला आहे.