विट्यात वीज दरवाढीचा झटका; व्यवसायही सापडला मोठ्या संकटात..

संपूर्ण देशाच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीज दर सर्वात महागडे असतानाही महावितरणकडून दरवर्षी लादल्या जात असलेल्या वीज दरवाढीने सामान्य ग्राहकांसह व्यापारी व औद्योगिक ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे व्यवसाय व उद्योग क्षेत्र मोडकळीस येण्याची शक्यता निर्माण झाली असल्याची भीती महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे सदस्य व विटा यंत्रमाग संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी व्यक्त केली.दि. १ एप्रिलपासून सरासरी साडे सात ते आठ टक्के इतकी वीज दरवाढ लागू झाली असून वीज आकार व वहन आकारात ६ ते १२ टक्के तसेच स्थिर आकारात १० टक्के वीज दरवाढ झाली आहे. मार्च २०२४ अखेरीस सरासरी प्रति युनिट दर ८ रुपये ४६ पैसे होता. तो आता एप्रिल २०२४ पासून ८ रुपये ९४ पैसे इतका झालेला आहे. या शिवाय इंधन समायोजन आकाराच्या नावाखाली होत असलेली प्रति युनिट ३५ पैसे अप्रत्यक्ष दरवाढ अगोदरच लागू झालेली आहे. त्यामुळे समायोजन आकारासह राज्यातील सरासरी वीज देयक मागणी दर आता तब्बल ९ रुपये २९ पैसे प्रतियुनिट पोहोचला आहे.किरण तारळेकर म्हणाले, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जात असलेल्या
राज्यकर्त्यांची बघ्याची भूमिका…..आपल्या राज्यातील हतबल वीज नियामक आयोग व महावितरणचा गलथान कारभार, प्रचंड वीज चोरी आणि गळती यामुळे प्रत्येक वर्षी होणारी वीज दरवाढ राज्याला मागे घेऊन जाणारी ठरत असून राज्यकर्ते यात काहीच हस्तक्षेप न करता केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत, ही चिंतेची बाब ठरत असल्याचे किरण तारळेकर म्हणाले.
वस्त्रोद्योगातील सूतगिरण्यांच्या वीज दरात आता सरासरी ३५ ते ४० पैसे प्रतियुनिट दर वाढ होत असून २५ हजार चात्यांच्या एका सूतगिरणीला दरमहा ५ लाख तर वार्षिक ६० लाखांचा अतिरिक्त भुर्दंड बसणार आहे. यंत्रमाग लघुउद्योगासही याचा फटका बसणार असून २७ अश्वशक्तीखालील ग्राहकांना २५ ते ३० पैसे तर त्यावरील ग्राहकांना ३० ते ३५ पैसे युनिटला दरवाढ बसणार आहे.
त्यामुळे अगोदरच नुकसानीत असलेला यंत्रमाग व्यवसाय या वीज दरवाढीने आणखी संकटात येऊन बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे महावितरणच्या या अनागोंदी व मनमानी वीज दरवाढीचा फटका सामान्य ग्राहकांसह औद्योगिक क्षेत्रालाही मोठ्या प्रमाणात बसणार आहे. परिणामी, यंत्रमागासह उद्योग क्षेत्रही या वीज दर वाढीमुळे संकटात सापडले आहे.