यावर्षी राम नवमी हि बुधवार दिनांक १७ एप्रिल या दिवशी आहे. हा रामनवमीचा सोहळा सर्वत्र अगदी उत्साहाने साजरा करण्यात येतो. सांगोला तालुक्यातील राजुरी येथे संजयकाका कुलकर्णी यांच्या लक्ष्मीदेवी मंदिरात दरवर्षी राम नवमी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
या उत्सवाचे औचित्य साधून सांगोला शहरातील रामभक्त विश्वनाथ ऊर्फ खंडू कुलकर्णी यानी कल्याण करी रामराया या गीताचा फलक मंदीरासाठी व भाविक भक्ताच्या सोयीसाठी भक्तीभावपूर्ण पद्धतीने प्रदान केला. या वेळी या फलकाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी उद्योजक रमेश फुले, गणेश दौंडे, बाळासाहेब ताकभाते, प्रा. राजाभाऊ ठोंबरे आदि उपस्थित होते. खन्डू कुलकर्णी व गणेश दौन्डे यांचेकडुन प्रसादाचे वाटप करण्यात आले.