Career Options After 10th: दहावीनंतर काय ? सायन्स क्षेत्र निवडताय तर……..

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांकडे करिअर करण्यासाठी अनेक पर्याय असतात. परंतु दहावीनंतर आपण कोणता कोर्स निवडता यावर तुमचं पुढील भवितव्य अवलंबून असतं. दहावीनंतर विद्यार्थी त्यांच्या आवडीचे विषय निवडू शकतात. विद्यार्थी नेहमी लोकप्रिय कोर्सकडे धाव घेतात. मग त्या कोर्समधून हजारो मुलं शिक्षण घेतात. त्यातली अनेक बेरोजगारच राहतात.

काही वेळा काही कोर्ससाठी हुशार मुलं प्रवेशही घेत नसल्याने अवघ्या ४० टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळतो आणि त्यांना नोकरीचीही संधी चालून येते. तेव्हा नीट विचार करून पर्याय निवडावा लागतो. तर तुम्ही सायन्स या क्षेत्रात प्रवेश घेणार असाल तर त्यामध्ये नेमके कोणकोणते कोर्स करता येतात याविषयी माहिती जाणून घेऊयात…..

पीसीएमबी – बारावीतील फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी या चारही विषयांवर आधारित बायो केमिस्ट्री, बायो मेडिकल इंजिनीअरिंग, बायो टेक्नॉलॉजी, बायो इन्फॉर्मेटिक्स, फार्मसी अशा विषयांकडे जाता येतं.

पीसीएम – या विषयांनुसार आर्किटेक्चर, डिफेन्स, नेव्ही, इंजिनीअरिंग, पायलट ट्रेनिंग, टेक्नॉलॉजीकडे वळता येतं.

पीसीबी – मेडिकल, व्हेटर्नरी सायन्स अॅण्ड अॅनिमल हजबण्डरी, पॅरामेडिकल कोर्सेस, अॅग्रीकल्चर सायन्स अशा विषयांसाठी हा ग्रुप उपयोगी पडतो.

एव्हिएशन, फूड सायन्स, फोरेन्सिक सायन्स, एन्व्हायर्न्मेंटल सायन्स, मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, बायो टेक्नॉलॉजी, लाइफ सायन्स, मॅथमेटिक्स यात पदवी अभ्यासक्रम करता येतो.

हे सर्व कोर्स चार ते पाच वर्षांचे असून त्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते.

तर विद्यार्थ्यांनो दहावी नंतर तुम्ही जर सायन्स क्षेत्रात करीयर करणार असाल तर वरील हे कोर्स तुम्हाला करता येतील. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोर्स निवडू शकता.

तर विद्यार्थ्यांनो पुढील आठवड्यात आपण बारावी सायन्सनंतर करिअरचे पर्याय जाणून घेऊया…….