MI vs PBKS : अटीतटीच्या लढतीत मुंबईचा विजय

 आयपीएलमध्ये 33 वी मॅच मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings ) यांच्यात पार पडली. यंदाच्या आयपीएलच्या गुणतालिकेत आठव्या नवव्या स्थानावर असलेल्या मुंबई आणि पंजाबमध्ये आजची लढत पार पडली. मुंबईनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये सात विकेटवर 192 धावा केल्या.  यामध्ये सूर्यकुमार यादवची 78 धावांची खेळी केली. पंजाब आणि मुंबई यांच्यातील ही लढत अटीतटीची झाली.

पंजाब किंग्जचा संघ 18m3 धावांवर बाद झाला आणि मुंबईनं 9 धावांनी विजय मिळवला. आशुतोष शर्मा आणि शशांक सिंगला पंजाबच्या इतर फलंदाजांची म्हणावी तशी साथ मिळाली नाही, त्यामुळं पंजाबचा निसटता पराभव झाला.  मुंबई इंडियन्सनं पहिल्यांदा फलंदाजी करत विजयासाठी ठेवलेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाब किंग्जची सुरुवात खराब झाली. पंजाबला पहिल्याच ओव्हरमध्ये धक्का बसला. पंजाब किंग्जनं धावसंख्येचा पाठलाग करताना सातत्यानं जाणाऱ्या विकेट न गमावण्याकडे लक्ष दिलं नाही.मुंबईच्या बॉलर्सनी पंजाबच्या फलंदाजांना मोठे फटके मारु दिले नाहीत.

शशांक सिंग, आशुतोष शर्मा या दोन्ही फलंदाजांनी संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. आशुतोष शर्मानं 61 धावा केल्या. शर्मानं 28 बॉलमध्ये 7 षटकार आणि 2 चौकारासह 61 धावा केल्या. दुसरीकडे पंजाब किंग्जचा फलंदाज शशांक सिंगनं 3 षटकार आणि दोन चौकारासंह 41 धावा केल्या. अखेरच्या ओव्हरमध्ये 12 धावा हव्या असताना पंजाबचा शेवटचा खेळाडू धावबाद झाल्यानं मुंबईनं विजय मिळवला.