Lok Sabha Election Phase 1: लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान

  लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election)  पहिल्या टप्प्याचं मतदान होतंय. 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात मतदान होतंय, एकूण 102 मतदारसंघात आज मतदार आपला मतदानाचं परम कर्तव्य बजावतील. राज्याचा विचार केला तर आज पूर्व विदर्भात पाच मतदारसंघात मतदान होतंय. नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या पाच मतदारसंघात मतदान होणार आहे. या पाचही ठिकाणी महाविकास आघाडी विरूद्ध महायुती अशी थेट लढत होतेय. यंदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे रिंगणात आहेत. 

तर  उत्तर प्रदेशातील 8, राजस्थानातील 13, मध्य प्रदेशातील सहा, आसाममधील पाच, बिहारमधील चार, महाराष्ट्रातील पाच, जम्मू-काश्मीर आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी एक, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशमधील प्रत्येकी दोन, त्रिपुरामधून एक, उत्तराखंडमधील सहा, तामिळनाडूमध्ये 39, पश्चिम बंगाल, सिक्कीम, नागालँड, अंदमान आणि निकोबार, मिझोराम, पुडुचेरी, मणिपूर आणि लक्षद्वीपमध्ये मतदान होणार आहे.

 यामध्ये महाराष्ट्रातील देखील काही मतदारसंघाचा समावेश आहे. यामध्ये चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, रामटेक आणि नागपूर या मतदारसंघाचा समावेश आहे. गडचिरोली सोडून इतर ठिकाणी आज सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजे दरम्यान मतदान होणार आहे. तर गडचिरोलीत सकाळी 7 ते 3 वेळेत मतदान होणार आहे.