३ ऐवजी ८ मार्च ला होणार मेळावा……..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार, दि. ३ मार्च रोजी इचलकरंजी जवळील कोरोची गावातील मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत होणारा जिल्हास्तरीय मेळावा काही अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. आता हा मेळावा दिनांक ८ मार्च २०२४ रोजी होणार असल्याचे मा. मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव तथा राज्य मुख्य समन्वयक डॉ. अमोल शिंदे यांनी कळविले आहे.

या मेळाव्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांचे लाभ महिला लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणार आहेत.मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाद्वारे ग्रामीण तसेच शहरी भागात महिलांना थेट लाभ देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात ये आहे. महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत सुधारित कार्यक्रमानुसार आता ८ मार्चला होणाऱ्या जिल्हास्तरीय मेळाव्यास सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले