खानापूर (ता. जुन्नर) येथून शेतातील विंधन विहिरीवरील पंधरा हजार रुपये किमतीचे सोलर काउंट कंट्रोलर चोरट्याने लंपास केले. याबाबतची फिर्याद मोहम्मद हनीफ सजनमिया शेख यांनी गुरुवारी (ता.१८) जुन्नर पोलिसांकडे दिली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शेख यांचे शेतजमीन गट नंबर ८१ मध्ये १४ मार्च ते ९ एप्रिल दरम्यान चोरीची घटना घडली आहे.