मंगळवेढा येथील नगरपालिका व छत्रपती श्री शिवाजी महाराज बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अंतिम मंजुरी दिली असल्याची माहिती अश्वारुढ पुतळा समितीचे अध्यक्ष अजित जगताप यांनी दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा बसवण्यास अंतिम मंजुरी मिळाल्याने शिवप्रेमी चौकामध्ये पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.मंगळवेढा येथील शिवप्रेमी चौकामध्ये छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा व त्याला जोडून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. अंतिम मंजुरी देण्यात आल्याने शिवभक्तामध्ये समाधानाचे वातावरण आहे.
याप्रसंगी खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर अवताडे, पुतळा समितीचे सचिव राहुल सावंजी, उद्योजक प्रतिक किल्लेदार, वारी परिवाराचे सतीश दत्तू, माजी नगरसेवक प्रवीण खवतोडे,सार्वजनिक शिवजयंती मंडळाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर कोंडूभैरी, गणेश सावंजी, अँड.संभाजी घुले, अनिल मुदगुल, आनंद मुढे, बाळासाहेब नागणे, हरिभाऊ देवकर यांच्यासह असंख्य शिवभक्त उपस्थित होते.