घुणकी येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह २९ एप्रिल ते ६ मेदरम्यान आहे. रविवारी (ता.२८) पहाटे पाच वाजता श्रींस महाअभिषेक मंत्रोपचार होतील.सोमवार (ता.२९) पासून पहाटे पाच वाजता काकड आरती, अभिषेक व पूजा, सात वाजता ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी तीन वाजता नाटाचे भजन, सायंकाळी पाच वाजता नामजप, सहा वाजता प्रवचन, रात्री नऊ वाजता कीर्तन होणार आहे.
सोमवारी (ता.२९) उत्तम मोरे (घुणकी) यांचे प्रवचन व वसंत शिंदे (पिशवी) यांचे कीर्तन होईल. मंगळवारी (ता.३०) गुरुवर्य गोपाळ आण्णा वासकर (पंढरपूर) यांचे प्रवचन, भागवत शिंदे यांचे कीर्तन, बुधवारी (ता.१) शरद जोंधळे (कासारवाडी) यांचे प्रवचन, रात्री नऊ वाजता संतोष पाटील (ऐतवडे) यांचे कीर्तन, गुरुवारी (ता.२) संजय पाटील (गिरोली) यांचे प्रवचन, ऋषिकेश वासकर (पंढरपूर) यांचे कीर्तन, शुक्रवारी (ता.३) प्रा. राजा माळगी (इस्लामपूर) यांचे प्रवचन, हनुमंत मिसाळ (कर्नाळ) यांचे कीर्तन होईल. शनिवारी (ता.४) सकाळी आठ वाजता दिंडी,
सायंकाळी प्रा. जयसिंग सुतार (कामेरी) यांचे प्रवचन, सावकर गुरुजी (करोली, जि. सातारा) यांचे कीर्तन, रविवारी (ता.५) धोंडिराम थोरबोले (गोजवडा, जि. धाराशिव) यांचे प्रवचन, विनायक चौगले (खोची) यांचे कीर्तन होणार आहे. सोमवारी (ता. ६) पारायणाची सांगता सकाळी आठ वाजता संजय पाटील (गिरोली) यांच्या काल्याच्या कीर्तनाने होईल. सकाळी ११ वाजता महाप्रसाद आहे.