सत्यजित पाटील-सरूडकर यांचे भावनिक आवाहन

इचलकरंजी शहराला स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे यासाठी नितीन जांभळे यांचा कायमपणे पाठपुरावा सुरू होता. त्याच्या पश्चात त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला मताधिक्यानी निवडून देवून त्यांना आदराजंली वाहूया असे भावनिक आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित बाबासाहेब पाटील (आबा) सरूडकर यांनी केले.लोकसभा हातकणंगले मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील (आबा) सरूडकर यांच्या प्रचारार्थ युवा नेते सुहास जांभळे यांच्या नेतृत्वाखाली गणेशनगरमधील अशोक हायस्कूलच्या पटागंणावर भव्य कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा आयोजीत केला होता. त्यावेळी सत्यजित पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले, आमचे वडील आणि माजी आम अशोकराव जाभंळे हे एकत्र काम करीत होते. त्यामुळे नितीन जांभळे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी मला निवडून द्या.

जांभळे समर्थकांच्यावतीने आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील – सरूडकर व्यासपीठावर माजी आम. अशोकराव जांभळे, सुहास जांभळे यांच्यासह इंडिया आघाडीचे पदाधिकारी व मान्यवर. अशोकराव जांभळे हे आमच्या वडिलांसमान असून मी त्यांच्या मुलांप्रमाणे आहे. नितीन जांभळे यांनी शहराच्या विकासासाठी जी स्वप्ने पाहिली होती. ती स्वप्ने मी पूर्ण करेन त्यासाठी सर्वांनी आशीर्वाद द्यावा असे आवाहन केले.
शहरामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यामध्ये लोकप्रतिनिधीनी लक्ष दिले नसल्यामुळे तो सोडविता आला नाही तेव्हा पाण्याचा प्रश्न राजकारण न आणता कोणालाही न दुखावता मार्गी लावू तसेच अडचणीत असलेल्या वस्त्रोद्योगाला नवसंजीवनी देण्यासाठी केंद्र व राज्यसरकार कमी पडत असून त्यांच्या फसव्या घोषणा आता जनतेच्या लक्षात आल्या असून जनताच त्यांना निश्चित धडा शिकवेल असे शेवटी स्पष्ट केले. मेळाव्याच्या प्रारंभी उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते कै. नितीन जांभळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक सुहास जांभळे यांनी केले. त्यामध्ये त्यांनी नितीन जांभळे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला असून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सत्यजित पाटील सरूडकर यांना दिल्लीत पाठवा असे आवाहन केले.