महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ हे मे रोजी सायंकाळी ५.०० वाजता थोरात चौकात सभा घेणार आहेत. या सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहावेत यासाठी सुरेश हाळवणकर यांनी भाजपा बरोबरच महायुती मधील घटक पक्षांची बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ १ मे रोजी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ जाहीर प्रचारसभा घेण्यास येणार आहेत. त्याच्या तयारीसाठी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीस महायुतीमधील घटक पक्षांनी उपस्थिती लावली.
सर्व गावातील लोक मोठ्या प्रमाणात कसे उपस्थित राहतील या संदर्भात मार्गदर्शन केले. योगी आदित्यनाथ यांची सभा ऐतिहासिक करण्याचा निर्धार व्यक्त केला.