आजपासून श्री भैरवनाथ यात्रेला सुरुवात….

सध्या सगळीकडे यात्रांची रेलचेल सुरु आहे. गावागावात यात्रासाठी अनेक कार्यक्रम देखील आखले जातात. येलूर (ता. वाळवा) येथील श्री भैरवनाथ यात्रा आजपासून म्हणजेच मंगळवार दि. ३० व बुधवार १ मे रोजी आहे. यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती तंटामुक्ती समिती अध्यक्ष राजन महाडिक यांनी दिली. यावेळी सरपंच विनायक महाडिक उपस्थित होते.

मंगळवारी सकाळी पहाटे ५ वाजता श्री भैरवनाथांची महापूजा, यात्रेच्या पहिल्या दिवशी मंगळवारी पहाटे गावातील भक्त नवसाचे दंडस्नान घातले जाते. सकाळी ९ वाजता सायकल शर्यती, चार वाजता सासन काठ्यांची मिरवणूक, सायंकाळी ६ वाजता बगाडाची मिरवणूक आहे. रात्री श्री भैरवनाथ देवाची पालखी निघणार आहे तसेच रात्री आठ वाजता लावणीचा कार्यक्रम आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता लोकनाट्य तमाशा व दुपारी चार वाजता कुस्ती मैदान आयोजित केले आहे. यावेळी यात्रा कमिटीचे विजय पाटील, धनाजी पाटील, चंद्रकांत पाटील, शशांक जाधव, शरद जाधव उपस्थित होते.