अलीकडे अवैध धंदे बेफामपणे सुरु आहेत. राजेरोसपणे, खुलेआम मटका, गांजा विक्री सुरु असल्यामुळे तरुणाई यामध्ये जास्त बळी पडत आहे. या अवैध धंद्याविरुद्ध पोलीस देखील पुरेपूर त्याची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. वाळवा तालुक्यातील पेठनाका येथील पुलाजवळ असणाऱ्या पानटपरीच्या मागे मटका जुगार घेणाऱ्या एकास पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवारी साडेसहाच्या सुमारास झाली. याबाबत हवालदार शिवाजी यादव यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रमेश रामचंद्र पवार (वय ६२, रा. रामोशीवाडा, पेठ) याच्याविरुद्ध जुगार अधिनियमाखाली गुन्हा नोंद केला आहे. त्याच्याकडून ७०० रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.
