इचलकरंजीत उद्या राजू शेट्टी यांची महापदयात्रा

सध्या लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत प्रत्येक पक्ष व्यस्त आहे. प्रचार, दौरे, सभा, पदयात्रा, गावोगावी भेटीगाठी यामध्ये नेतेमंडळी कार्यकर्ते जोमाने काम करत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी र यांची उद्या दुपारी ३ ते ६ या मी वेळेत जवाहरनगर ते शहापूर अशी न भव्य पदयात्रा काढण्यात येणार आहे.

राजमाता जिजाऊ क्रीडा संकुल, स्वामी अपार्टमेंट येथून ही पदयात्रा सुरु होणार आहे. या पदयात्रेत शिराळा, वाळवासह हातकणंगले, शिरोळ तालुक्यातून मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार आहेत. यानंतर सायंकाळी ६ वाजता शहापूर चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.