दिल्लीमधील शाळांना आज सकाळीच बॉम्बची धमकी आली होती. यासोबतच शहरातील अग्निशमन दलाला देखील 60 पेक्षा अधिक फोन कॉल आले असल्याची माहिती समोर आली. या पार्श्वभूमीवर प्रत्येक शाळांची तपासणी केली जात असून, अद्याप कुठेही बॉम्ब आढळला नसल्याचं सांगण्यात येतंय.भूषण पाटील हे काँग्रेसचे मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आहेत. त्यांना आज पक्षाकडून AB फॉर्म देण्यात आला.
पुणे-बंगळुरू महामार्गावर कराडजवळ मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे. त्यामुळे पुण्याहून कोल्हापूरला जाणारी वाहतूक संथ गतीने होत आहे. गेल्या चार-पाच तासांपासून इथे ट्रॅफिक जॅम झालं असून; दोन्ही बाजूंनी सुमारे 15 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्याचं सांगण्यात येतंय.
दिल्लीतील 100 हून अधिक शाळांना बॉम्बची धमकी पाठवण्यात आली होती. यानंतर प्रशासन अलर्ट झालं असून, विद्यार्थ्यांना शाळांमधून सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. दिल्ली पोलीस सर्व शाळांची तपासणी करत असून, अद्याप कुठेही बॉम्ब आढळून आलेला नाही; अशी माहिती अतिशी यांनी दिली आहे.