लेमन ट्री हॉटेल्सच्या शेअर्समध्ये सध्या चढ – उतार दिसून येत आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये नुकतीच एक टक्क्यांहून अधिक घसरण झाली. मात्र, नंतर रिकव्हरी दिसून आली. सध्या हा शेअर 1.15 टक्क्यांनी वाढून 122.75 रुपयांवर ट्रेड करत आहे. कंपनीने उत्तराखंडमध्ये 72 खोल्यांच्या मालमत्तेसाठी लायसन्स ऍग्रीमेंटवर सही केली आहे. कंपनीचे मार्केट कॅप 9,732.75 कोटी रुपये आहे.
ही प्रॉपर्टी आर्थिक वर्ष 2025 पर्यंत उघडणे अपेक्षित आहे. लेमन ट्री हॉटेल्सची पूर्ण मालकीची उपकंपनी कार्नेशन हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेडद्वारे व्यवस्थापन केले जाणार आहे. 16 ऑक्टोबरला कंपनीने डेहराडून, उत्तराखंड इथे 55 खोल्यांच्या मालमत्तेसाठी परवाना करार केला होता.
या महिन्याच्या सुरुवातीला कंपनीने गुजरातमधील सोमनाथ इथे रिसॉर्ट उघडण्यासाठी आर्टिसन रिसॉर्ट्ससोबत फ्रँचायझी कराराची घोषणा केली. कंपनीने मॅक्लिओडगंज इथे आपली लेटेस्ट फ्रेंचायझी प्रॉपर्टी लेमन ट्री हॉटेल उघडली, जी हिमाचल प्रदेशमधील ग्रुपची तिसरी प्रॉपर्टी आहे.
भारतातील आणि जगातील हे 95वे लेमन ट्री हॉटेल आहे. कंपनीने पेनिनसुला सूट्स लाँच केले, बेंगळुरूमध्ये लेमन ट्री अंतर्गत ही सहावी प्रॉपर्टी आहे.
कंपनीने गुजरात आणि नेपाळमधील दोन प्रॉपर्टीजसाठी परवाना करारही केलाय. यासोबतच लेमन ट्री प्रीमियर ब्रँड अंतर्गत डेहराडूनमध्ये 80 खोल्यांच्या प्रॉपर्टीसाठी करारही करण्यात आला आहे.
ऑगस्टमध्ये, कंपनीने भुवनेश्वरमधील लेमन ट्री हॉटेल ब्रँड आणि कसौलीजवळच्या लेमन ट्री माउंटन रिसॉर्ट या दोन प्रॉपर्टीसाठी परवाना करार केला.
जुलैमध्ये, कंपनीने पंजाबमधील 80 खोल्यांच्या प्रॉपर्टीसाठी आणि गोमती नगर, लखनऊमध्ये 72 खोल्यांच्या प्रॉपर्टीसाठी परवाना करार केला आहे.