खानापूर आटपाडी मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी वंचित फॅक्टर सज्ज!

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानापूर आटपाडी मतदार संघामध्ये जोरदार यंत्रणा सुरू असलेली पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानापूर आटपाडी मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संग्राम नाना माने यांनी मतदारसंघातील गावागावात जोरदार यंत्रणा उभा करण्यास सुरुवात केली आहे. गावागावातील वंचित आणि ओबीसी समाज एकत्र करून सगळ्यांना संग्राम नाना माने विरोधी उमेदवारांना धक्का देण्याची जोरदार तयारी करत आहेत. गावागावात लोकांच्या गाठीभेटी सुरू असणाऱ्या संग्राम नाना माने यांनी जोरदार प्रतिसाद असल्याचे सांगत या निवडणुकीत वेगळा निकाल पाहायला मिळेल असा विश्वास देखील व्यक्त केला आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानापूर आटपाडी मतदारसंघात वंचित फॅक्टर सज्ज झाला आहे. वंचित आघाडीचे उमेदवार संग्राम नाना माने यांच्या मतदारसंघातील गुप्त यंत्रणेने चांगला जोर धरला आहे. मतदार संघातील गावागावात जाऊन संग्राम नाना माने यांनी लोकांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत तर नागरिकांमधून जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे वंचितचे उमेदवार संग्राम नाना माने यांनी स्पष्ट केले आहे.