सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड.प्रकाश आंबेडकर यांची उद्या रविवारी (ता. ५) मिरजेतील किसान चौकात सकाळी दहा वाजता सभा आहे. त्यानिमित्त प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरला आहे.
अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना समाजातील विविध घटकांकडून वाढता पाठिंबा मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीने विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला होता. याबाबतचे ट्विट वंचित आघाडीच्या ‘एक्स’ हॅंडलवरून करण्यात आले. वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र दिले. आता ॲड. आंबेडकर यांची सभा होत आहे.