दहावी, बारावीची परीक्षा यंदा फेब्रुवारी-मार्च महिन्यात झाली. विद्यार्थी आता निकालाची वाट पाहत आहेत. दहावी, बारावीच्या निकालासंदर्भात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) महत्वाची माहिती देण्यात आली आहे. या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. बोर्डाने निकालाची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही.
परंतु मे महिन्यात निकाल येण्याची शक्यता आहे.मागील वर्षी सीबीएसई बोर्ड 10वी, 12वीचा निकाल मे महिन्यातच जाहीर केला होता. यंदा लोकसभा निवडणूक होत असल्याने दहावी आणि बारावीचे निकाल लवकरात लवकर जाहीर करावेत, असा दबाव मंडळावर आहे. यंदा निकालात सीबीएसई बोर्डाने एक महत्वाचा बदल केला आहे. हा निकाल बोर्डाची वेबसाइट cbse.gov.in वर जाहीर करण्यात येणार आहे. परंतु प्रथमच डिजिलॉकर अॅप आणि वेबसाइट digilocker.gov.in वर मिळणार आहे. त्यासाठी डिजिलॉकरवर खाते असणे गरजेचे आहे.
असे बनवा डिजिलॉकरवर खाते
- DigiLocker वर निकाल मिळण्यासाठी त्यावर खाते तयार करावे लागेल.
- प्रथम DigiLocker च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल
- त्यानंतर “Get Started with Account Confirmation” वर जावे लागेल.
- तुमचा वर्ग (10वी किंवा 12वी) निवडा आणि त्यानंतर शाळेचा कोड, रोल नंबर आणि 6 अंकी प्रवेश कोड टाका.
- आता मोबाईल नंबर, जन्मतारीख आणि OTP इत्यादी तपशील भरा.
- निकाल जाहीर झाल्यानंतर, तुम्हाला तुमचा निकाल थेट या खात्यावर मिळेल.
- तुमचे डिजिलॉकरवर खाते असेल तर तशी सूचना तुम्हाला खाते तयार करताना देईल. त्यामुळे पुन्हा खाते तयार करण्याची गरज नाही.
- वेबसाईटप्रमाणे डिजिलॉकर अॅपवर या पद्धतीने खाते उघडता येईल. त्यासाठी गूगल प्ले स्टोर अॅप डाऊनलोड करुन घ्या.