सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. प्रत्येक पक्ष हा आपापल्या परीने मोर्चेबांधणी देखील करीत आहेत. अशातच उद्या ज्येष्ठ नेते शरद पवार सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
ते लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे स्टेशन चौक सांगली येथे अनावरण करण्यासाठी येणार आहेत. हातकणंगले, सांगली या दोन लोकसभा मतदार संघाची चौकशी देखील करणार आहेत अशी माहिती मिळत आहे.
हातकणंगले मतदारसंघ हा पुन्हा राष्ट्रवादीच्या ताब्यात कसा आणता येईल यावर त्यांचा भर असणार आहे. वाळवा, शिराळा तसेच शाहूवाडी तालुक्यातील अनेक निवडक कार्यकर्ते पवार यांना भेटणार असल्याची चर्चा देखील आहे.