महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठा भूकंप होण्याचे संकेत मिळत आहेत. कारण शिवसेना नेत तथा राज्याचे उत्पादन शुल्क विभाग मंत्री शंभूराज देसाई यांना सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे.महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी चार टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. आता शेवटचं पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या 20 मे ला होणार आहे. यानंतर 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार आहे. कारण महाविकास आघाडीतील बडे नेते महायुतीत सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील काही नेत्यांकडून लोकसभा निवडणुकीत आम्हाला आतून मदत करण्यात आल्याचा खळबळजनक दावा मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे.