बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. अनुष्का शर्मा काही दिवसांपासून सिनेसृष्टीपासून दूर आहेत. अभिनेत्री सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अनुष्का सध्या आपला पती विराट कोहलीसोबत सेकंड पॅरेंट्स लाइफ एन्जॉय करताना दिसत आहे. नुकतचं लंडनमध्ये तिने आपला दुसरा मुलगा अकायचं स्वागत केलं आहे.
अद्याप या जोडप्याने लेक वामिका आणि मुलगा अकायचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही. अशातच आता विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ते आपल्या रिटायरमेंटबद्दल भाष्य करताना दिसून येत आहेत. तसेच व्हिडीओमध्ये मुलांना घेऊन लंडनमध्ये शिफ्ट होणार असल्याची हिंटदेखील देत आहे. या व्हिडीओनंतर अनुष्का शर्मा आपला पती आणि मुलांसोबत परदेशात शिफ्ट होणार असल्याचं म्हटलं जात आहे. अद्याप दोघांनीही याबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही.
विराट कोहली सध्या ‘आयपीएल 2024’मध्ये व्यस्त आहे. अनुष्का शर्मा नुकतीच मुलगा अकायला घेऊन लंडनहून भारतात आली आहे. अनुष्काने लंडनमध्ये अकायला जन्म दिल्याने ती लंडनमध्येच शिफ्ट होणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती. आता विराट कोहलीच्या व्हिडीओमुळे या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.
विराट कोहलीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विराट रिटायरमेंटबद्दल भाष्य करताना दिसत आहे. विराट कोहली म्हणतोय, एक खेळाडू म्हणून आमच्या करिअरमध्ये एक एक्सपायरी डेट असते. मी पाठिंबा देण्याचं काम करतोय. मी सातत्याने खेळू शकत नाही. मला कधीही पश्चाताप होणार नाही. जोपर्यंत मी खेळतोय तोपर्यंत मी 100% देईल. पण एकदाचा खेळून मी काही दिवसांसाठी गायब होऊ शकतो.
