वंदनीय लोकनेते स्व.राजारामबापू पाटील यांच्या ४१ व्या पुण्यतिथीनिमित्त उद्या शुक्रवारी म्हणजेच १७ जानेवारी रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना राजारामनगर येथे परिसरातील कीर्तनकारांचा सन्मान व कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे. श्री. लक्ष्मणराव ढोबळे साहेब आणि आदरणीय श्री. जयंत पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. तसेच ह.भ.प. विशाल महाराज खोले यांच्या विशेष कीर्तनाचे आयोजनही करण्यात आले आहे. त्यांचे श्रुश्राव्य कीर्तन ऐकण्याची संधी आपणा सर्वांना लाभणार आहे. सर्वांनी या सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
