विटा पोलिसांची धडक कारवाई! नवरा बायको अटक

विट्यातील आरती ज्वेलर्स मधून तीन लाख रुपये रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर चोरीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक शरद नेमाने यांनी विटा पोलीस ठाणेकडे गुन्हे प्रकटीकरण पथकास तपासाच्या सूचना दिल्या.

त्यानुसार पोलीस कर्मचारी प्रमोद साखरपेठ, महेश संपाळ आणि अक्षय जगदाळे यांना गोपनीय बातमीदार मार्फत सदरचा गुन्हा हा सातारा येथील विश्वास हनुमंत गुजर आणि पूजा विश्वास गुजर यांनी केला त्याची माहिती मिळाली. यानंतर विटा पोलिसांच्या पथकाने सातारा येथे सापळा रचून या चोरी प्रकरणी पती पत्नीला ताब्यात घेतले.

यावेळी त्यांच्याकडून चौकशी केली असता त्यांनी वरील गुन्हा केल्याबाबतची कबुली दिली. यानंतर या आरोपी पती पत्नीला विटा पोलिसांनी अटक केली आहे.