विटा – म्हैसाळ रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य ठेकेदाराचा निषेध!

विटा म्हैसाळ रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत असून, वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. वारंवार लेखी, तोंडी तक्रार देऊनही राष्ट्रीय महामार्ग अधिकारी खड्डे भरत नाहीत. तेव्हा महामार्ग विभागाच्या कारभाराचा व ठेकेदाराचा निषेध करण्यासाठी दलित महासंघाचे (मोहिते गट) वतीने विटा-तासगाव- म्हैसाळ रस्त्यावरील खड्ड्यांची श्राद्ध विधी घालून अनोखे आंदोलन केले.

विटा-तासगाव- म्हैसाळ रस्त्यांवरील खड्ड्यांचे श्राद्धविधी घालताना जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार, आशुतोष देवकुळे व कार्यकतें.
६५ किमी लांबीचा आहे. परंतु सदर रस्ता अरुंद आहे. विटा-म्हैसाळ रस्त्यावरील खड्डे न भरता गंधारीची भूमिका घेत ठेकेदारास जाणीवपूर्वक पाठीशी घातले जात आहे.यापूर्वी अनेकवेळा रस्ता दुरुस्ती नावाखाली ठेकेदार व अधिकारी यांनी कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारला आहे. त्याचीही चौकशी करावी.


खड्ड्याकडे दुर्लक्ष करून अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आंदोलनावेळी तात्यासाहेब देवकुळे, प्रशांत केदार यांनी केली. विटा-तासगाव- म्हैसाळ रस्त्याचे काम निकृष्ट करून होणाऱ्या त्रासाबद्दल अधिकारी, ठेकेदाराला देणे-घेणे नाही .स्त्यावरील खड्ड्यातून वाट काढीत सामान्य नागरिक प्रवास करीत आहेत. याबाबत राष्ट्रीय महामार्गचे कोल्हापूर विभागाचे संबंधित अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून, पत्रव्यवहार करून, फोनवरून खड्डे भरण्याबाबत वारंवार सांगूनसुद्धा अधिकारी दखल घेत नाहीत. सामान्य नागरिकांना होणारा त्रासाचे अधिकारी व ठेकेदार यांना काही देणे-घेणे नाही