बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने रेमल वादळाने धुमाकूळ घातलं आहे. दरम्यान याचा परिणाम अनेक राज्यात होत आहे महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णेतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे तर काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.कोल्हापूर जिल्ह्यात चक्रिवादळाचा परिणाम काही अंशी दिसून आला मागच्या २४ तासांत दिवसभर वातावरण ढगाळ होते. अनेक भागात दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. तर काही ठिकाणी रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या.
अचानक तापमान कमी झाल्याने उष्णतेपासून दिलासा मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत होते तर ढगाळ वातावरण झाल्याने शेतकऱ्यांनी खरिपाचा हंगाम साधण्यासाठी बैल आणि यंत्राच्या साहाय्याने मशागतीच्या कामासाठी लगबग सुरू केली आहे. सरासरी तापमानात ४.६ अंशांनी घट झाल्याने पारा ३०.१ अंशांपर्यंत घसरला. कमी झालेले तापमान आणि वारे यामुळे दिवसभर पावसाळी वातावरण होते. बुधवारपासून तीन दिवस मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज आहे व्यक्त करण्यात आला आहे.