सोलापुरात प्रणिती शिंदेनी रोखला भाजपचा विजयरथ!

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रणिती शिंदे विजयी झाल्या आहेत.काँग्रेस नेते सुशिलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांनी भाजपचे राम सातपुते यांचा पराभव केला आहे.काँग्रेसनेते सुशिलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांनी भाजपचे राम सातपुते यांचा पराभव केला आहे.

गेल्या दहा वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या या बालेकिल्ल्याला कॉंग्रेसने खिंडार पाडले आहे.भाजपच्या राम सातपुतेंना पराभवाची धूळ चारत कॉंग्रेसने विजय मिळवला आहे.प्रणिती शिंदेंच्या रूपाने सोलापुरला आता तरूण नेतृत्व मिळणार आहे.निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार प्रणिती शिंदे यांना ४ लाख ३३ हजार ३९२ मते मिळाली आहे.