विधानसभा निवडणूका जसजश्या जवळ येत आहेत तसतसे राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. या निवडणूकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा बोलबाला अधिक असल्याचे दिसून येतंय. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माजी नगराध्यक्ष अॅड.वैभव सदाशिवराव पाटील हे तुतारी हातात घेणार आहेत. येत्या काही दिवसात हा पक्ष प्रवेश होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
वैभव पाटील यांच्या बॅनरवरून याच आठवड्यात घड्याळाचे चिन्ह देखील गायब झाले आहे. वैभव पाटील हे खानापूर आटपाडी मतदारसंघातील महत्वाचे नेते असून स्वच्छ सर्वेक्षणात विटा शहराचा देशात प्रथम क्रमांक आणण्यामध्ये त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले होते. खानापूर आटपाडी मतदार संघात लोकनेते हणमंतराव पाटील, माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचा राजकीय वारसा त्यांना आहे. मतदारसंघात तरुणांमध्ये त्यांचे विशेष संघटन आहे.