इचलकरंजी, जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत विविध विकास कामांचा शुभारंभ खास. धैर्यशील माने आणि आम. डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला.महानगरपालिकेस जिल्हा वार्षिक योजनेतून रक्कम ७ कोटी २६ लाख १५ हजार ४५ रूपयांचानिधी खासदार धैयशिल माने वआम. राहूल आवाडे यांच्य प्रयत्नामुळे प्राप्त झाला आहे. या निधीतून शहरांमध्ये विविध आवश्यक विकास कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. गुरूवार ता. ५ रोजी प्र.क्र. २५ मध्ये गटर करणे, प्र.क्र. २१ मध्ये हाफ राऊंड गटर करणे. प्र. क्र.१८ मध्ये रस्ते डांबरीकरण करणे. प्र. क्र. १६ मध्ये गटर करणे. प्र. क्र. २३ रस्ता काँक्रीटीकरण करणे व गटर करणे. प्र.क्र. ३० येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे. प्र. क्र. ३० रस्ता खडीकरण करणे. या कामांचा उद्घाटन समारंभ तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहापूर प्राथमिक शाळेच्या आवारात वृक्षारोपन कार्यक्रम आणि सार्वजनिक आरोग्य विभागा कडून महानगरपालिकेस मिळालेल्या शववाहिकेचे पुजन खास. धैर्यशील माने, आम. डॉ राहुल आवाडे आणि आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते त्याचबरोबर उपायुक्त नंदू परळकर यांचेसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करणेत आला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, अमृत भोसले, माजी नगरसेवक महादेव गौड, दिपक सुर्वे, किसन शिंदे, युवराज माळी, दादा भाटले, राजु आलासे, रणजीत अनुसे, प्रमोद बचाटे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत इचलकरंजीत विविध विकास कामांचा शुभारंभ
