अनेक भागात सध्या विकासकामांचा धडाका सुरु आहे. अनेक भागात नागरिकनांच्या समस्या, प्रश्न जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. रस्ते, वाहतूक, पाणी याबाबतीत अनेक भागात विविध समस्यांना सामोरे जावे लागते. वेळोवेळी मागणी करूनही याकडे दुर्लक्ष होत राहते. सांगली जिल्ह्यातील नागरिकांचा प्रवास सोईचा होण्यासाठी सांगली जिल्ह्यासाठी अधिकच्या नविन बसेसची गरज आहे. त्या बसेस लवकरात लवकर मिळाव्यात अशी मागणी आ. जयंतराव पाटील यांनी परिवहनमंत्री ना. प्रताप आ. जयंतराव पाटील सरनाईक व रा. प. महामंडळाचे व्यवस्थापक माधव कुसेकर यांच्याकडे पत्राद्वारे केली.
आ. जयंतराव पाटील यांनी पत्रात म्हंटले आहे की, सद्य स्थितीत रा.प. महा मंडाळकडून विविध सवलती जाहीर करण्यात आलेल्या असल्याने मागील वर्षीच्या तलनेत यावर्षी प्रवाशी संखेत वाढ झाल्याची दिसून येत आहे. परंतु वाढत्या प्रवाशी संख्येच्या तुलनेत रा.प. सांगली विभागत एस. टी. बसेसची संख्या कमी असल्याचे भासत आहे. मुळातच गेल्या तीन वर्षामध्ये बसेसची संख्या सुमारे १५० ते २०० ने कमी झालेली आहे. तसेच बसेस जुन्या असल्यामुळे मार्गात बंद पडतात व कांही गाड्या स्क्रॅप करण्यात आलेल्या आहेत.
या कारणास्तव सर्वांत जास्त खेड्या पाड्यातून येणाऱ्या गाड्याच्या फेन्या कमी झाल्यामुळे ग्रामीण भागातून शहरीभागाकडे येणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थीनीचे हाल होत असल्याचे जाणवते. महामंडळाने कांही जिल्ह्यांना नवीन एस. टी. बसेस दिल्या असल्याचे समजते. परंतु त्यामध्ये सांगली जिल्ह्याचा समावेशन झालेला नाही. तरी वरील परिस्थिती पहाता रा.प. सांगली विभागास जास्तीत जास्त नवीन एस. टी. बसेस मिळण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.