विट्यात महिलांसाठी कर्करोगतपासणी शिबिर….

विटा येथे रोटरी क्लबच्या वतीने महिलांसाठी मोफत कर्करोग निदान व मेमोग्राफी तपासणी शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष विक्रम जैन, सचिव अमृतराव निंबाळकर व जनसंपर्क प्रमुख किरण तारळेकर यांनी दिली.तारळेकर म्हणाले,मेमोग्राफी तपासणीचा खर्च मोठा आहे.

परिणामी सर्वसामान्य व गरीब महिलांना हा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे स्तनांच्या कर्करोगाची तपासणी मेमोग्राफीने पूर्णपणे मोफत केली जाणार आहे. या शिबिरासाठी सांगली रोटरी क्लबच्या मिडटाऊनचे व नगरपरिषदेचे सहकार्य मिळणार आहे. महिलांनी या मोफत कर्करोग निदान शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष विक्रम जैन, किरण तारळेकर, अमरसिंह निंबाळकर यांनी केले आहे.