उद्या भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन….

माजी मंत्री, ज्येष्ठ नेते मा. अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते सांगोला विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार बाबासाहेब देशमुख आणि जत विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार गोपीचंद पडळकर तसेच सांगली विधानसभा आम. सुधीर (दादा) गाडगीळ यांचा भव्य नागरी सत्कार उद्या रविवारी 19 जानेवारीला सायंकाळी पाच वाजता स्टेशन चौक सांगली येथे आयोजित करण्यात आलेला आहे. गणपती मंदिर, सराफ कट्टा, कापड पेठ स्टेशन चौक सांगली येथे ठीक चार वाजता सर्वांचे भव्य रॅली होणार आहे. श्री गणपती मंदिरापासून रॅलीची सुरुवात होणार आहे.