आमदार शहाजीबापू पाटील यांचे आवाहन…

महिलांसाठी त्यांची भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेल्या महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे आणि ही योजना आज एक जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे.

ही योजना 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले आहे. या योजनेसाठी एक जुलै ते 15 जुलै दरम्यान अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे त्यामुळे सांगोला विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे अशा सूचना देखील आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिल्या आहेत.