जिल्ह्यात सलग चार दिवस दमदार पाऊस झाला. मात्र, बुधवारी धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून धो- धो पडणाऱ्या पावसाचा जोर बुधवारी ओसरला. दिवसभर ढगाळ वातावरण होते. परंतु दमदार पावसाने उसंत घेतली. पलूस, कडेगाव, खानापूर, तासगाव आणि आटपाडी तालुक्यांतील काही गावांत चांगल्या पावसाने हजेरी लावली. पूर्व भागातील अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस झाला.
उघडीपीमुळे पेरण्यांची लगबग सुरू राहिली. दरम्यान, कृष्णा आणि वारणा नद्यांची पाणीपातळी स्थिर होती. सलग पावसामुळे उपनगरातील रस्त्यांची वाताहात झाली आहे. दिवसभर ढगाळ वातावरण होते. मोठ्या पावसाची शक्यता होती. परंतु पावसाचा जोर कमी झाला. पलूस कडेगाव, खानापूर, आटपाडी तालुक्यांतील काही गावांमध्ये चांगला पाऊस झाला. काही काळाने पावसाने उसंत घेतली. पावसाचा जोर ओसरला तरी कृष्णा आणि वारणा नद्यांची पाणीपातळी स्थिर होती. सांगलीच्या आयर्विन पुलाची पाणीपातळी १०.९ फूट राहिली.
.