आधुनिक सेंद्रिय शेती काळाची गरज

आजच्या यांत्रिक आणि रासायनिक शेतीमुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. त्यामुळे नैसर्गिक व आधुनिक सेंद्रिय पद्धतीने शेती (Modern organic farming) करणे ही काळाची गरज गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत युवा पिढीने शेतीकडे उदयोजकतेच्या दृष्टीने पहिले पाहिजे ,असे मत उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सचिन शिंदे यांनी व्यक्त केले.

माध्यमिक प्रशाला बेणापूर -सुलतानगादे येथे जागतिक युवा कौशल्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेमध्ये पोस्टर करण्यात आला. यावेळी शाळेमध्ये पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती . स्पर्धेत विद्यार्थांनी कौशल्य विकास, रोजगार संधी आणि सेंद्रिय शेती यावर आधारित विचार मांडले पोस्टर स्पर्धेतील प्रथम क्रमांक अमृता सुरेश भागत , द्वितीय शुभांगी सतीश सुतार, तृतीय क्रमांक आयशा यासिन मुजावर यांनी पटकावला . विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी पाटील सर, भुरके , गणपत मामा . दिलीप मामा, पालक , मान्यवर ,शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते . सूत्रसंचालन सुतार, संयोजन मुख्याध्यापक घाडगे , आभार प्रदर्शन झेंडे यांनी केले.