इस्लामपूर-कामेरी रस्त्याच्या कामाला….

अलीकडच्या काळात अनेक गावात रस्त्यांची वाताहत झालेली पहायला मिळत आहेच अशातच अनेक अपघात होऊन अनेकजण मृत देखील झालेले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती सुरु आहे. इस्लामपूर-कामेरी रस्त्याचे रूंदीकरण आणि दोन्ही बाजूंनी गटारीचे काम संथगतीने सुरू आहे. रस्त्याचे रूंदीकरण आणि नूतन काँक्रिटीकरण करताना काही घरे गटारीवरच बांधलेली दिसतात. त्यामुळेच नूतन रस्त्याच्या कामामध्ये अडथळे निर्माण होत आहेत.

तर परिसरातील अंतर्गत रस्ते आणि पिण्याच्या पाण्याची सोय करताना येथील रहिवासी यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. दत्त टेकडी मार्गे जाणाऱ्या रस्त्याचे सध्या काँक्रिटीकरण आणि दोन्ही बाजूंनी गटारीचे काम सुरू आहे. कामेरी ते दत्त टेकडीपर्यंत रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. दत्त टेकडी ते इस्लामपूर दरम्यान काहीनी रस्त्यावरच अतिक्रमण केले आहे. येथील मालमत्ताधारक नेत्यांच्या नावाखाली शासकीय कामात अडथळे आणतात. त्यामुळे कामाला गती येत नाही. इस्लामपूर-कामेरी रस्त्यावर अतिक्रमणाचा विळखा असल्याने गटारीतील पाणी रस्त्यावर येणार आहे. काँक्रिटीकरण रस्त्यामुळे कनेक्शन घेताना नागरिकांना त्रास होणार आहे.