इचलकरंजीतून हज यात्रेसाठी गेलेले सर्व हज यात्रेकरु सुखरुप


हज यात्रेसाठी जगभरातील लाखोंच्या संख्येने मक्का मदिना याठिकाणी जमले आहेत. इचलकरंजीतूनही ११० यात्रेकरू हज यात्रेसाठी गेलेले आहेत. काही दिवसांपासून याठिकाणी उष्णतेचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे उष्माघातावर त्रास होऊन काही यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची बातमी आल्याने इचलकरंजीत चिंता वाढली होती. इचलकरंजी शहरातून हज यात्रेसाठी गेलेले ११० यात्रेकरु सुरक्षित व सुखरुप आहेत. इचलकरंजी हज कमिटीच्या माध्यमातून त्यांच्याशी सातत्याने संपर्क साधला जात आहे.