रस्त्यात येणारे खांब काढण्याची वाहनधारकांतून मागणी!

अनेक गावातील आपणाला दुरवस्था झालेली पाहायला मिळत आहे. यामुळे अपघातांच्या संख्येतही वाढ होताणाचे चित्र दिसून येते. सद्या पावसामुळे देखील रस्त्यांची वाताहात झालेली आहे अशातच अनेक विजेचे खांब देखील रस्त्यात असल्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

हातकणंगले तालुक्यातील रांगोळी येथून निढोरी ते हेरवाड राज्यमार्ग जातो. गेले दोन महिने रांगोळी ते इचलकरंजी रस्त्याचे रुंदीकरण चालू असल्याने रस्ता दोन्ही बाजूला दहा फुटांनी वाढला आहे.माणकापूर हद्दीत असणारे वीज खांब व ट्रान्सफॉर्मर तीन ते चार फुटांनी रस्त्यावर आले आहेत.

हे खांब ठेकेदार काढणार की महावितरण काढणार याबाबत प्रश्न संदिग्धत आहे. रात्रीच्यावेळी अंदाज येत नसल्यामुळे वीज खांबास धडकून अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. खांबांमुळे अपघात होऊन नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वीज खांब व ट्रान्सफॉर्मर काढण्याची वाहनधारकांतून मागणी होत आहे.