खानापूर विधानसभेला….

विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. लवकरच आता विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीची पडझड व महाविकास आघाडीला जनतेचे पाठबळ मिळाले. यामुळे खानापूर मतदारसंघात सध्या महाविकास आघाडीकडे कार्यकर्त्यांचा ओढा वाढला आहे. एका युवा नेत्यांने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्याच्या चर्चा रंगली आहे.

महायुतीकडून प्रबळ दावेदार असताना जयंत पाटील यांच्या भेटीने तर्क-वितर्क वर्तवले जात आहेत. सध्या खानापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे पारडे जड असले तरी आघाडीकडून सांगली लोकसभेचा पॅटर्न राबवला जातो की काय? याची महायुतीतील युवा नेत्यांना धास्ती लागली आहे. म्हणून काही नेते नूतन खासदार विशाल पाटील यांचा लोकसभेचा पॅटर्न राबविण्याच्या तयारीत आहेत.