राज्यातील 13 सहकारी साखर कारखान्यांना केंद्र सरकारच्या NCDC मार्फत 1898 कोटी मार्जिन लोन मंजूर करण्यात आलं आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांनी बैठकीत या प्रस्तावांना हिरवा कंदील दिला आहे.कर्ज मंजूर करण्यात आलेल्या या साखर कारखान्यांमध्ये बहुतांश कारखाने हे सत्ताधाऱ्यांशी संबंधित आहेत.
तर विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनाही मदत करण्याचं धोरण अवलंबल्याचं दिसून येतंय.लोकसभा निवडणुकीच्या आधी राज्य मंत्रिमंडळाच्या उप समित्याने ही प्रस्ताव मंजूर केले होते. त्याला आता केंद्रीय सहकार मंत्रालयानेही मंजुरी दिली आहे. यामध्ये मंगळवेढा येथील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना यांचा समावेश आहे.
