ग्रामीण भगत शिक्षणाने केला आदर्श

जत हा कायम दुष्काळी भाग असला तरी शिक्षणामध्ये आघाडीवर आहे. प्रा. सुभाष मोरे सरांनी दुष्काळी भागात प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन त्यांनी श्री संपतराव माने महाविद्यालयात गेली ४० वर्ष प्रामाणिकपणे सेवा केली. त्यांनी आपल्या कुटुंबाबरोबरच इतरांनाही शिक्षणासाठी प्रवृत्त केले, याचा आम्हला अभिमान आहे. असे मत विक्रम सावंत यांनी व्यक्त केले.

श्री संपतराव माने महाविद्यालयात मा. प्र .प्राचार्य ग्रंथपाल प्रा. सुभाष केशवराव मोरे यांचा सेवापुर्ती गौरानिमित्त ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते बाळासाहेब खर्डेकर , प्र संचालक डॉ. धनंजय सुतार प्रमुख उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्रा. संभाजीराव मोरे हे होते. कार्यक्रमाचा प्रारंभ कै . संपतराव माने नाना यांच्या प्रतिमा पूजनाने झाला. यावेळी आजी माजी विद्यार्थी , प्राध्यापक , मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. सुजय नाना शिंदे , सुधीर चव्हाण , वसंतराव मोरे, सिद्धाराम चव्हाण , शामराव चौगुले , वासुदेव साळुंखे , प्रा. संभाजीराव मोरे, प्रा. दिलीप देवकाते , भाऊसाहेब पाटील, डॉ. निवास वरेकर , प्रा जयसिंगराव सावंत , संतोषराव नाईक , व्ही .जी . बिराजदार , बाळासाहेब मसूले , डॉ. आर . पी. आढाव उपस्थित होते. मानपत्राचे वाचन डॉ. बालाजी कांबळे यांनी केले. संयोजन चिरंजीव डॉ. शुभम मोरे , प्रा . आर . पी. आढाव , आजी -माजी विध्यार्थी संघटना यांनी केले. प्रास्ताविक स्वागत प्रा. अंकुशराव निकम यांनी केले. डॉ. दशरथ देशिंगे यांनी आभार मानले.