विविध स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या एसटी सरकार गैंगचा म्होरक्या संजय तेलनाडे याच्यासह सातजणांना महिन्याभरापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे. दरम्यान, मंगळवारी इचलकरंजी शहर कॉंग्रेस कमिटी येथे सत्यजित पाटील-सरुडकर यांच्या उपस्थिती झालेल्या कार्यक्रमास तेलनाडे हा हजर होता. हद्दपारीची कारवाई केली असतानाही त्याने कार्यक्रमास हजेरी लावल्याचे समजताच शिवाजीनगर पोलिसांनी पथकासह याठिकाणी धाव घेतली असता तेलनाडे निघून गेला होता असे फिर्यादीत नमुद केले आहे.
तेलनाडे याच्यावर हद्दपारीची कारवाई केली असताना नियमांचे उल्लंघन केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस निरिक्षक राजू ताशिलदार यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातून वर्षभरासाठी हद्दपार केले असतानाही कॉंग्रेस कमिटी येथील कार्यक्रमास उपस्थित राहिल्याप्रकरणी एसटी सरकार गँगचा म्होरक्या माजी नगरसेवक संजय तेलनाडे याच्यावर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद पोहेकॉ प्रकाश अशोक पुजारी यांनी दिली आहे.