कोल्हापुरचे सुपुत्र महाराष्ट्र क्रिकेट संघा

कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा खेळाडू अनिकेत नलवडे व श्रेयस चव्हाण यांची बीसीसीआय मार्फत घेण्यात येणाऱ्या २३ वर्षाखालील महाराष्ट्र संघात निवड झाली. स्पर्धा एकदिवसीय साखळी स्पर्धा आहे. स्पर्धेत महाराष्ट्र सह पंजाब, हिमाचल प्रदेश, पॉँडेचरी, केरळ, कर्नाटक, नागालॅड संघांचा समावेश आहे. सुरत येथे स्पर्धा होणार आहे.  

अनिकेत नलवडे २०१४ पासुन वेगवेगळया वयोगटात महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करत आहे. यामध्ये १४ व १६ वर्षाखालील वेस्ट झोन संघात सर्वाधिक धावा,  १६ वर्षाखालील विजय मर्चंट स्पर्धेत ४ सामन्यात १६० धावा व ९ बळी , १९ वर्षाखालील कुचबिहार स्पर्धेत ६ सामन्यात ४०० धावा व १२ बळी ,२५ वर्षाखालील कर्नल सी.के.नायडू स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या उपकर्णधार पदी निवड. एमसीए खुला गट निमंत्रीत स्पर्धेत ९ सामन्यात ६२७ धावा केल्या आहेत.

श्रेयस चव्हाण १६ वर्षाखालील महाराष्ट्र संघात निवड, १९ वर्षाखालील निमंत्रीत स्पर्धेत कोल्हापूर कडुन खेळताना ५ सामन्यात महाराष्ट्रात सर्वाधीक ४६ बळी घेतले होते. या कामगीरीच्या जोरावर त्यांची विनु मकंड ट्राॅफी साठी महाराष्ट्र संघात निवड झाली होती. दोघांची निवड पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवड शिबिरातून करण्यात आली आहे..