सुलतानगादे (ता. खानापूर) येथे मच्छिंद्रनाथ महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती.या गावात दरवर्षी या पालखीचा मुक्काम असतो. या पालखीबरोबर येणाऱ्या दोन ते अडीच हजार वारकऱ्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था सुलतानगादे ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत.१९६५ पासून सुलतानगादे येथे मुक्काम करण्याची परंपरा सुरू झाल्याचे गावकरी सांगतात. पालखी सोहळ्यापूर्वी गावकऱ्यांची गावात बैठक होत असते व सर्व संमतीने गावातील प्रत्येक घरामध्ये विभागून सुलतानगादे (ता. खानापूर) येथे पंढरीच्या वाटेने निघालेल्या मच्छिंद्रनाथ महाराजांच्या पालखीचा एक दिवस मुक्काम असतो.
या पालखी सोहळ्यात सहभागी असलेल्या वारकऱ्यांची सेवा करण्याची परंपरा सुलतानगादे गावकऱ्यांनी यंदाही जपली आहे.किल्लेमच्छिंद्रगड येथून पंढरपूरला प्रत्येक वर्षी आषाढी वारीसाठी मच्छिंद्रनाथ महाराजांची पालखी जात असते. या पालखीमधून हजारो भाविक पायी चालत पंढरपूरच्या दिशेने जात असतात.वारकऱ्यांची सोय केली जाते. आता वारकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्यामुळे व गावातील अनेक कुटुंबे शेतामध्ये राहण्यास गेल्यामुळे आता एकाच ठिकाणी जेवणाची सामुदायिक पद्धतीने सोय केली जाते.
गेल्या कित्येक पिढ्यांपासून सुलतानगादे येथे मच्छिंद्रनाथ महाराजांच्या पालखीतील वारकऱ्यांची सेवा व व्यवस्था करण्याची परंपरा आमच्या गावाने यावर्षीही जपली आहे. सर्व गावकऱ्यांनी मोठ्या आनंदाने या वारकऱ्यांची व्यवस्था केली आहे. पुढेही परंपरा अशीच चालू राहील.तुकाराम जाधव अध्यक्ष तंटामुक्ती समिती सुलतानगादे यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबाकडून ठरावीक रक्कम गोळा केली जाते.सोमवारी सुलतानगादे येथे मच्छिंद्रनाथ महाराजांच्या पालखी रथाचे आगमन झाल्यानंतर गावकऱ्यांनी या रथाचे व वारकऱ्यांचे स्वागत केले. महामार्गालगत असलेल्या मोकळ्या जागेत वारकऱ्यांची जेवणाची व्यवस्था केली होती.