पुण्यात परवा मंगळवारी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विधानसभेसाठी सांगली जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. यात खानापूर विधानसभा मतदारसंघासाठी एकूण सहा जणांनी उमेदवारीची मागणी केली आहे.
विशेष म्हणजे यांत राष्ट्रवादी अजित पवार गटात असलेले माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि वैभव पाटील तर भाजप मधील माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी थेट पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे उमेदवा रीची मागणी केली.
त्यामुळे या मतदारसंघात महायुतीतली धुसफूस समोर आली असली तरी मुळात खानापूर मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये नेमका कोण लढविणार याबाबत निर्णयच झालेला नाही, असे आज पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अॕड. बाबासाहेब मुळीक यांनी निदर्शनास आणले आहे. त्यामुळे तुतारी फुंकण्यासाठी इच्छुक दोन्ही माजी आमदार आणि माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्यासह सारेच आवाक झाले आहेत.